लोणावळा नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी,गुडघ्याला बाशिंग बांधलेले झाले शांत







मावळ मराठा न्युज-लोणावळ्यात नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांचा मोठा हिरमोड झाला आहे.गुढघ्याला बाशिंग बांधलेल्या इच्छुक यांनी साडी वाटप,गणेशोत्सव,नवरात्र आणि दसऱ्याला मंडळाला भेटी गाठी, वाढदिवस लग्नाचा वाढदिवसाला,छोट्या छोटया कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधण्यासाठी धावपळ होती.परंतु आज नगराध्यक्ष पदाची सोडत निघाली त्यात हे पद अनुसूचित जातीसाठी निघाल्याने पक्का हिरमोड झाला आहे. नगर परिषदेच्या प्रभाग आरक्षण सोडत ८ ऑक्टोबरला निघणार आहे.लोणावळा नगर परिषदेच्या प्रभाग आरक्षणाची सोडत ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता लोणावळा नगर परिषदेच्या इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर होणार आहे. प्रभाग आरक्षणे जाहीर होणार आहे. त्यांनतरच लोणावळा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रंगत वाढणार आहे. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार यांचे प्रभाग आरक्षणाकडे लक्ष लागले आहे. तळेगाव दाभाडे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण लोणावळा शहरामध्ये नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले असले तरी तळेगाव दाभाडे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आले आहे तसेच वडगाव नगरपंचायतीचे आरक्षण हे सर्वसाधारण प्रवर्गातील महिला तर देहूगाव येथील आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी आले आहे.



