जागतिक वसुंधरा दिनानिमित्त लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने वृक्षारोपण



मावळ मराठा न्युज -लोणावळा,दि. २२ एप्रिल २०२५ रोजी जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने गणपती मंदिर रोड, रायवूड येथील Auxillium Convent Highschool च्या मागे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी “माझी वसुंधरा” शपथ घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करण्यात आली.या उपक्रमात नगरपरिषदेचे पाणीपुरवठा अभियंता श्री. यशवंत मुंडे, कार्यालय अधीक्षक श्री. संतोष खाडे, स्वच्छता निरीक्षक सौ. ऐश्वर्या काटकर, श्री. विजय लोणकर, श्री. जितेंद्र राऊत, शहर समन्वयक श्री. विवेक फडतरे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




