संत शिरोमणी माती-कला बोर्डासाठी २५ कोटीची तरतूद पुणे जिल्हा कुंभार समाजोन्नती मंडळाच्या शिष्टमंडळाने घेतली फडणवीस यांची भेट

मावळ मराठा न्यूज : मुंबई,आज सकाळी पुणे जिल्हा कुंभार समाजोन्नती मंडळाचे शिष्टमंडळ मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तसेच वित्त मंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांची त्यांच्या मेघराज या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन, त्यांनी यंदाच्या संत शिरोमणी माती-कला बोर्डासाठी २५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केल्याबद्दल त्यांचा यथोचित असा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचे अध्यक्ष संजयजी गाते तसेच महासंघाचे युवक आघाडीचे अध्यक्ष मा.संजयजी जोरले साहेब तसेच लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा श्रीमती सुरेखा जाधव ,जिल्हा अध्यक्ष संतोषशेठ कुंभार, महासंघाचे युवक कार्याध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जेजुरीकर, सचिव रामचंद्र हाडशीकर, दत्तात्रय पांगारकर,मुळशी तालुका अध्यक्ष भगवानशेठ कुंभार, मावळ तालुका अध्यक्ष तानाजी दरेकर, सल्लागार शिवाजी भिगवणकर, मावळ तालुका सल्लागार मारूती कुंभारसर,तालुका कार्याध्यक्ष संतोष गा.कुंभार,मावळ युवक मा. अध्यक्ष मकरंद कुंभार व इतर मान्यवर उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page