तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील जेठालालच्या जीवाला धोका!



मावळ मराठा न्यूज ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मागील १४ वर्षांपासून या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. याआधी देखील अमिताभ बच्चन व धर्मेंद्र यांच्या घरात बॉम्ब ठेवला असल्याची माहिती अज्ञात व्यक्तीने दिली होती. यावेळी या कलाकारांसाठी पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी तपास केला असता अज्ञातांनी दिलेली धमकी फसवी असल्याचे समोर आले आहे.या मालिकेत काम करणारे अभिनेते दिलीप जोशी म्हणजे सर्वांचे आवडते कलाकार जेठालाल यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर येत आहे. एका अज्ञात व्यक्तीने नागपूर कंट्रोल रूमला कॉल करून दिलीप जोशी यांना धोका असल्याचे सांगितले. या व्यक्तीने जोशी यांच्या घराबाहेर २५ लोक हत्यारे घेऊन उभी असल्याची माहिती दिली.




