वाय सी क्लासेसचा अभिनव उपक्रम, मातीशी जोडण्यासाठी या क्रीडा स्पर्धाचें आयोजन, नगराध्यक्ष राजेंद्र सोनावणे कडून कौतुक







मावळ मराठा न्यूज – लोणावळा -वाय. सी. क्लासेस क्रीडा उत्सव २०२५ दरवर्षी वाय. सी. क्लासेस क्रीडा उत्सवामध्ये विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात या स्पर्धेत जवळ जवळ २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले कौशल्य सादर केले यामध्ये चेस, कॅरम, कबड्डी, खो-खो,लंगडी,क्रिकेट, रस्सीखेच,डॉज बॉल, १०० मीटर रनिंग, व रिले रेस या खेळांचा समावेश होता याप्रसंगी लोणावळा शहराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री राजेंद्र सोनवणे तसेच नगरसेवक सुभाष डेनकर, रजनीकांत यंदे क्रीडा क्षेत्रातील तज्ञ श्री अशोक मते (प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय पंच), एशियन गोल्ड मेडलिस्ट सौ ज्योती कंधारे, कुमारी तपस्या मते व कुमारी प्रीती दुडे या राष्ट्रीय खेळाडू उपस्थित होत्या याप्रसंगी श्री अशोक मते यांनी खेळाचे महत्व मुलांना समजावले तसेच वाय. सी. क्लासेस चे संचालक श्री निवृत्ती दुडे सर यांनी आपले विचार मांडताना सांगितले की आजच्या पिढीचा मातीशी संपर्क तुटला आहे त्यांना पुन्हा मातीशी जोडण्यासाठी या क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्यातून संघर्ष शिकून शारीरिक, मानसिक व वैचारिक जडणघडण होण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे तसेच नगराध्यक्षांनी आपल्या लोणावळ्यात क्रीडा संस्कृतीच्या विकासासाठी मैदान उपलब्ध व्हावे त्याचबरोबर होतकरू खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी आर्थिक मदत करण्यासाठीची विनंती करण्यात आली.त्यावर नगराध्यक्षांनी ही आपल्या भाषणात वाय. सी. क्लासेसच्या उपक्रमाचे कौतुक केले व सुचवलेल्या सूचनांचा नक्कीच विचार करू असे आश्वासन दिले व श्रीफळ फोडून क्रीडा उत्सवाचा शुभारंभ केला यावेळी पत्रकार विशाल विकारी तसेच विजय इंगुळकर, सहादू कालेकर, वसंत कालेकर व सागर कालेकर हेही उपस्थित होते या सर्व खेळाचे व कार्यक्रमाचे नियोजन आयोजन प्रो.दीपेश गोणते यांनी उत्कृष्ट रीतीने केले व त्यांना सहकार्य करणारे वाय. सी.क्लासेसचा स्टाफ सौ सुजाता मॅडम, शेख मॅडम,दुडे मॅडम, मयूर कंगुटकर व सर्व माजी विद्यार्थी या सर्वांमुळे क्रीडा उत्सव अत्यंत उत्साहात पार पडला व त्यानंतर पारितोषिक वितरण समारोह करून सर्व मुलांनी खेळाचा पूर्णपणे आनंद लुटला.

यात विजेता १०० मी धावण्याच्या स्पर्धा (मुले )१०० मी धावण्याच्या स्पर्धा (मुली)प्रथम क्रमांक – शिवप्रसाद वाबळेप्रथम क्रमांक – भुमीका जारद्वितीय क्रमांक निश्चल बोडकेद्वितीय क्रमांक – सायली सरोजतृतीय क्रमांक – चैतन्य सोनवणेतृतीय क्रमांक – प्रतिक्षा बोते ४०० मी रिले रेस (मुले)४०० मी रिले रेस (मुली)लहान गट)प्रथम क्रमांक – भुमीका जाटप्रथम क्रमांक तनीष ढोरे,सायली सरोज,श्लोक पहिलवान,श्रावणी शेलार,चिरंजीव पांडवराजकुमार पाटील,(मोठा गट)प्रथम क्रमांक- साई शिंदे,ओमकार गोणतेशुभम घनवट,शिवप्रसाद वाबळे# बुद्धीबळ सार्धा (मुले),# बुद्धीबळ स्पर्धा (मुली)प्रथम क्रमांक – कार्तिक भिवडेप्रथम क्रमांक- विद्या लंकेद्वितीय क्रमांक – अभित्रीत सुखकर सुपेकरद्वितीय क्रमांक – प्राची शर्मातृतीय क्रमांक – दिपेश पडवळतृतीय क्रमांक – आचल मोर्चा.कॅरम स्पर्धा (मुले)प्रथम क्रमांक – अभिजीत सुपेकरडॉजबॉल-लंगडी, कबड्डी, खो-खो, रस्सीखेच, क्रिकेट (सांघिक खेळ) विजेते.१० वी मुली (सर्व खेळामध्ये विजेते )इ. १० वी मुले (सर्व खेळांमध्ये विजेते ) ११ वी सायन्स मुली (डॉजबॉल, खो-खो, लंगडी) १२ वी कॉमर्स मुले (कबड्डी) १२ वी सायन्स मुले (क्रिकेट, डॉजबॉल, रस्सीखेच)३.१२ वी सायन्स मुली (रस्सीखेच, कबड्डीद्वितीय क्रमांक- हर्बल गोणतेतृतीय क्रमांक- स्वरान पिलाणे# कैरम (मुली)प्रथम क्रमांक – समीक्षा दळवीद्वितीय क्रमांक – सानिया मनियार



