जागतिक परिचारिका सन्मान दिनानिमित्त- जनरल हॉस्पिटल संचलित- नर्सिंग स्कूलच्या परिचारिकांचा सन्मान समारंभ संपन्न




मावळ मराठा न्युज :- मंगळवार दिनांक १४ मे २०२४ संस्थेचे अध्यक्ष श्री गणेश खांडगे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुण्या डॉ. दिपाली ईश्वर झवर/ भंडारी- विशेष अतिथी- संस्थेचे चेअरमन शैलेश भाई शहा- रोटरीयन राकेश सिंघानिया आणि स्कूलचे पालकमंत्री डॉक्टर शालिग्राम भंडारी! स्कूलच्या प्रिन्सिपल श्रीमती मोनालिसा पारगे,उपप्राचार्य क्रिस्टीना टी आणि सर्व मान्यवरांनी प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने समारंभाची सुरुवात करण्यात आली. साहित्य, कला, क्रीडा या विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ पार पडल्यानंतर अध्यक्ष श्री गणेश खांडगे यांनी उपस्थित परिचारिकाना संबोधित करताना त्यांच्या कर्तव्याची जाणीव देऊन परिचारिका सन्मान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. विशेष अतिथी चेअरमन- शैलेश भाई शहा यांनी परिचारिकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे किती आवश्यक आहे हे अत्यंत मोजक्या शब्दात व्यक्त करून आपल्या शुभेच्छा दिल्यात. पुण्याचे रोटरीन राकेश सिंघानिया यांनीही या समारंभाचे मनापासून कौतुक करून आपल्या शुभेच्छा दिल्यात. प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. दिपाली यांनी पावर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून वैद्यकीय व्यवसायातील निष्ठेच्या संदर्भात विद्यार्थ्यांशी अचूक संवाद साधला. याबरोबरच आपण आपला सर्वांगीण विकास कसा करू शकतो,याचाही विद्यार्थ्यांना गुरु मंत्र दिला. ज्येष्ठ डॉ.शाळीग्राम भंडारीनी आदर्श मानवी जीवनशैलीचा संकल्प विद्यार्थ्यांकडून विविध दाखले, काव्यपंक्ती, शेरोशायरी आणि दृष्टांताचा आधार घेऊन सोडवून घेतला. समारंभ यशस्वी होण्यास- नर्सिंग स्कूलचा सर्व शैक्षणिक स्टाफ आणि तिसऱ्या वर्षातील सहाय्यभूत झालेत. त्यापैकी विशेष स्वागत समारंभ आणि बक्षिस वितरण नियोजन प्राचार्य सौ. मोनालिसा पारगे,माइक व्यवस्थापन अभिषेक बुग्गे,छायाचित्रण परमेश्वर राठोड,सूत्रसंचालक प्रथमेश सोनवणे आणि वर्षा सुतार यानी केले.




