लायन्स क्लब ऑफ लोणावळा लिजेंडस यांच्या ऑक्टोबर अॅक्टिव्हिटी वीकचा शुभारंभ सामाजिक उपक्रमाने








मावळ मराठा न्युज – लोणावळा,दिनांक ०१/१०/२०२५ रोजी क्लबतर्फे लोणावळा नगरपालिकेच्या शाळा क्रमांक १ व २ यांना Kent कंपनीचे २० लिटर क्षमतेचे दोन पाण्याचे फिल्टर भेट देण्यात आले.या उपक्रमाच्या प्रकल्प प्रमुख होत्या लायन सौ. प्रतिभा दरेकर, ज्यांनी अत्यंत मनपूर्वक व नियोजनबद्ध रीतीने हा उपक्रम यशस्वी केला.या प्रसंगी क्लबच्या अध्यक्षा लायन वैशाली साखरेकर, सेक्रेटरी लायन मिनाक्षी गायकवाड , ट्रेझरर लायन नुतन घाणेकर, लायन राजेश मेहता, लायन सुरेश गायकवाड व लायन कीर्ती अग्रवाल, उपस्थित होते.शाळा क्रमांक १ व २ यांच्या मुख्याध्यापिका अनुक्रमे लायन सौ. प्रतिभा दरेकर व सौ. माधवी जोशी, तसेच दोन्ही शाळांचा शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांनी उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले.या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि स्वच्छ पाणी पुरवठ्याची काळजी घेत क्लबने सामाजिक उत्तरदायित्वाची एक उत्कृष्ट प्रचिती दिली.



