रोटरीयन विजया नितीन कल्याण यांची रोटरी क्लब ऑफ लोणावळाच्या अध्यक्ष पदी निवड





मावळ मराठा न्युज -लोणावळा,२०२५-२६ या वर्षासाठी रोटरीयन विजया कल्याण यांचे अध्यक्षपद आणि मुस्तफा कॉन्ट्रॅक्टर,दुरिया रामपूरवाला आणि नवीन संचालक मंडळ यांच्या शानदार पदग्रहण समारंभाचे अध्यक्ष सन्मानीय पास्ट रोटरीयन इंटरनॅशनल डायरेक्टर डॉ महेश कोटबागी आणि असिस्टंट गवर्नर रोटरीयन भालचंद्र लेले यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या थाटात येथील हॉटेल चंद्रलोक येथे संपन्न झाला. यावेळी मावळते अध्यक्ष रोटरिअन नारायण शरवाले, ऍड रोटरीयन मोनाली कुलकर्णी,रोटरीयन जयवंत नलोडे, रोटरी क्लब ऑफ लोणावळाचे सदस्य रोटरीयन विजया नितीन कल्याण यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले शुभचिंतक,पेण,पुणे येथून आलेले रोटरीयन आणि लोणावळ्यातील प्रतिष्टीत नागरिक या पदग्रहण समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रोटरीयन यांना सन्मानपत्र आणि पुष्पगुछ देऊन डॉ महेश कोटबागी यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. डॉ महेश कोटबागी यांनी त्यांचे मनोगतात आपल्या रोटरीयन यांना मार्गदर्शन केले आणि मावळत्या अध्यक्ष आणि संचालक मंडळाचे कौतुक केले नवीन अध्यक्ष रोटरीयन विजया कल्याण आणि संचालक मंडळाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रमुख पाहुणे रोटरिअन भालचंद्र लेले यांनी डॉ महेश कोटबागी यांच्या परिचय करून दिला.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद कुलकर्णी यांनी केले तर आभार रोटरीयन नितीन कल्याण यांनी मानले.




