भांगरवाडी कन्या शाळेतील ड्रेनेज रिफीलट्रेशनचा प्लांट स्थलांतर करा,नवीन इमारतीत ईनडोअर गेमची सोय करा, प्रकाश पाठारे यांची खासदार बारणे कडे मागणी

मावळ मराठा न्युज-लोणावळा,मावळ लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना लोणावळा भांगरवाडी येथील कन्या शाळेतील ड्रेनेज रिफीलट्रेशनचा प्लांट उभारण्यात आला होता त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना त्याचा त्रास होत आहे व भांगरवाडी तील युवकांना खेळायला मैदान नसल्याने तो प्लांट दुसरीकडे शिप्ट करावा व शाळेचे प्रस्तावित इमारत बांधताना भांगरवाडी तील युवक व नागरिकांसाठी पूर्वी जसा महात्मा गांधी हॉल मध्ये नागरिकांना इंडोर गेम्सची सोय होती तशाच प्रकारची इंडोर गेम्सची त्यात तरतूद करण्यात यावी यांसाठी मावळ उपतालुका प्रमुख प्रकाश पठारे यांच्या कडून खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी शिवसेनेचे उप तालुका प्रमुख रामभाऊ सावंत,युवासेना मावळ लोकसभा प्रमुख विशाल हुलावळे, शिवसेना नेते नवनाथ भाऊ हरपूडे,शिवसेना उपशहर प्रमुख विशाल पठारे, युवा सेना उपशहर प्रमुख संकेत जाधव,शिवसेना उपविभाग प्रमुख केतन फाटक,हनुमंत साबळे,दुर्वेश बोडके,प्रथमेश पठारे,दुर्वेश कडू, शुभम फाटक,आदित्य शिंदे व भांगरवाडीतील नागरिक उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page