नांगरगावच्या सर्व पत्नी व सून असलेल्या मतदारांसाठी बीएलओ आणि सुभाषभाऊ डेनकर यांचेकडून जाहीर आवाहन

}

मावळ मराठा न्युज – लोणावळा,*मतदारांना जाहीर आवाहन* नांगरगावातील सर्व पत्नी व सूनबाई असलेल्या मतदारांना सूचित करण्यात येते की सध्या संपूर्ण भारत देशात निवडणूक आयोगामार्फत एसआयआर (SIR) मॅपिंग (Mapping) व प्रोजेनी (Progeny) चे काम चालू आहे. त्यामुळे पत्नी व सून असलेल्या महिलांची नावे 2002 च्या मतदार यादीत नाव असलेल्या त्यांच्या वडील किंवा आई व वडील-आई नसल्यास त्यांच्या आजोबा किंवा आजी यांच्या वारस-नावाशी लिंक करणे बंधनकारक आहे. नावे वारसाच्या नावाशी लिंक नाही केल्यास निवडणूक आयोकडून ही नावे वगळली जाणार असल्याचे निर्देशित करण्यात आलेले आहे.*तरी नांगरगावच्या सर्व पत्नी व सून असलेल्या मतदारांनी माहेरच्या संबंधित बीएलओ (BLO) कडून 2002 च्या मतदार यादीतील खालील माहिती दिनांक 15 एप्रिलपर्यंत आणून बीएलओकडे व्हाट्सपद्वारे किंवा नांगरगाव शाळा क्रमांक 8 येथे सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 पर्यंत प्रत्यक्ष भेटून द्यावी व राष्ट्रीय कार्यास प्रत्येक मतदाराराने सहकार्य करावे ही नम्र विनंती. 2002 च्या मतदार यादी रेकॉर्डनुसार*मतदाराचे नाव -*मतदार यादी भाग क्र.-**मतदार यादीतील अनुक्रमांक-*वरील मतदारांनी आपली माहिती दिलेल्या मुदतीत बीएलओ यांना नाही पुरवल्यास पुढील काळात यादीतून नाव वगळले गेल्यास यास प्रत्येक मतदारच जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे आवाहन लोणावळा नगरपरिषद नांगरगाव विभागाचे नगरसेवक सुभाष भाऊ सुमंतराव डेनकर आणि BLO 87 नांगरगाव शुभांगी पालकर (जाधव) यांनी केले मतदारांना आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page