मेहता म्युझिकल व एम अँड ए म्युझिकल अकॅडमी यांच्या वतीने ८० व्या स्वातंत्र्य दिन विविध सामाजिक उपक्रम आणि देशभक्तीपर गीतांनी साजरा

मावळ मराठा न्युज – लोणावळा,मेहता म्युझिकल व एम अँड ए म्युझिकल अकॅडमी यांच्या वतीने ८० व्या स्वातंत्र्य दिन विविध सामाजिक उपक्रम आणि देशभक्तीपर गीतांनी साजरा करण्यात आला.माजी सैनिक व वीर पत्नी, तसेच धीरूभाई कल्याणजी , अरविंद भाई मेहता, मृदुला पाटील, संध्या गव्हले, यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ऐ मेरे प्यारे वतन या गीताने करण्यात आली. संदीप चित्ते, सुचित्रा चांदोरकर, रश्मी शिरस्कर, ज्योती रांगणे,पांडुरंग तिखे गोरख चौधरी, अंशिका गोणते, रिषी नागर, जया गोडबोले, मंगल राणे, राजेश मेहता,आर्या बांदल, संतोषी बांदल, गुरुप्रसाद वासकर, अशोक गुगळे, अशोक साळवे या गायक कलाकारानी विविध देशभक्ती पर गीते गायली. आर्या बांदल हिने सॅक्सोफोन वर सारे जहाँसे अच्छा हे गीत सादर केले. माजी सैनिक श्री महेश थत्ते, CH A R A, श्री बी व्ही कडू MCPD, एच सी शर्मा,CH MECH , श्री प्रसाद गद्रे CH AT Armi, महेश्वर भिंगे, पी एस ढाकरे, सानंद कुमार, PO ME , वीर पत्नी नमिता पासी ,सरोजकुमार , हेमलता शर्मा,रतन कदम, यांना सन्मान चिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. *मेहता म्युझिकल्स चे संचालक राजेश मेहता व आर्या मेलडीज ची गायिका आर्या बांदल यांना लोणावळा संगीत रत्न पुरस्कार* देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व गायक कलाकारांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रगीत गायन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. *लायन्स क्लबच्या Let’s Meet* या संघटनेच्या माध्यमातून पूरग्रस्त बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. संदीप चित्ते यांनी ध्वनि व प्रकाश व्यवस्था केली व अनिल बांदल व प्रियांका बांदल यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. उमा मेहता यांनी हा कार्यक्रम आयोजित करून सर्वांना खूप खूप आनंद दिला त्याबद्द्ल त्यांचे आभार. रश्मी शिरस्कर यांनी सूत्र संचालन केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page