लोणावळा पुणे रेल्वे प्रवासी व कामगार ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दसरा खंडेनवमी उत्साहात साजरी

मावळ मराठा न्यूज़ ,लोणावळा : दरवर्षी प्रमाणे यंदाही लोणावळा पुणे रेल्वे प्रवासी व कामगार ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दसरा खंडेनवमी उत्साहात साजरी करण्यात आली या वेळी उपस्थित रोज प्रवास करणारा कामगार वर्ग व प्रवासी वर्ग या उत्सव सोहळा पुजेसाठी उपस्थित राहुन आपण रोज प्रवास करत असलेल्या रेल्वेच्या बोगी मध्ये सजावट करुन पुजा अर्चा करून तिचे आभार व्यक्त करतात. रेल्वेच्या डब्यात अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम आयोजित राबविण्यात येतात रेल्वे व रेल्वेच्या डब्यात येजा करणारे सर्व हे आपले बांधव आहेत व आपण एक कुटुंब असल्याची भावना व्यक्त करताना प्रवासी वर्ग व कामगार ग्रुप व्यक्त करतात. रेल्वेही आमची अन्नदाता आहे ती आम्हाला वेळेवर सुखरूप ने आण करते त्या बद्दल तिचे कृतज्ञतेने आभार मानले जाते, आज चा हा कार्यक्रम श्री सागर पोठफोडे ह्यांच्या अध्यक्षतेखाली झाली व सूत्रसंचालन श्री अजितदादा तिकोने यांनी केले यामध्ये, व सहकार्य करणारे श्री अजित गरवड, नितीन पोठफोडे, विजू काटकर, अभिजात माळी, विशाल गुरव, प्रणय अंबुरे, गणेश जाधव, गणेश गायकवाड, बबलू गायखे, गोरख नानेकर, प्रवीण खेंगले, चेतन गुप्ते, सुहास पवार, प्रतीक राजे, अनिल गावडे इत्यादी मंडळी हजर होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page