गीताजयंती महोत्सव योगीराज हॉल,तळेगाव येथे संपन्न

मावळ मराठा न्युज :- तळेगाव,गीताजयंती महोत्सव योगीराज हॉल,तळेगाव या समारंभ प्रसंगी व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे बहुआयामी व्यक्तिमत्व श्री संकेत पोंक्षे, समारंभाचे अध्यक्ष स्थानी लेखक,व्याख्याते डॉ.शाळीग्राम भंडारी, भारतीय संस्कृती जपणारे विशेष अतिथी श्री आशिष पाठक,तसेच ग्रामीण भागातील संस्कृत भारतीच्या मुख्य प्रवर्तक सौ मंजुषा तेलंग आणि त्यांच्या सहकारी सौ वसुधा साठे या मान्यवरांच्या शुभहस्ते भारत माता,भगवतगीता पूजन करण्यात आले. दीप प्रज्वलनाने यासमारंभाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शंख ध्वनी वरद लेले आणि इशस्तवन सौ प्राची गुप्ते यांनी आपल्या मधुर स्वरात सादर केली. भगवद्गगीतेच्या १८ अध्यायातील ७०० श्लोक मुखदगत असणाऱ्या सौ मृण्मयी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली गीतेतील १२ आणि १५ अध्यायाचे सांघिक पठण करण्यात आले. त्यानंतर प्रमुखपाहुणे संकेत पोंक्षे यांनी आपल्या मनोगतात संस्कृत भाषेचे आणि गीतेचे महत्व विशद केले. संस्कृतभाषा ही अर्थार्जनाची भाषा तर आहेच पण त्याबरोबरच आत्मविकास आणि आत्मानुभूती देणारी ही भाषा आहे असे पष्ट केले. भगवतगीता हा जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ ठरल्यामुळे राष्ट्रिय चारित्र्य यातूनच घडू शकते असा विश्वास त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला. विशेष अतिथी श्री आशिष पाठक यांनी संस्कृत भारतीच्या आगामी सर्व उपक्रमास सर्वतोपरी सहकार्य असेल अशीग्वाही दिली. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. शालिग्राम भंडारी यांनी संपूर्ण भगवतगीता तोंडपाठ असणाऱ्या आपल्याला हजारो व्यक्ती भेटतील पण आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष गीता जगणारे क्वचितच आढळतील. भविष्यातील आपल्या कर्म सिद्धांताचा,विचारांचा उच्चार करणारे बरेच असतात पण आपल्या मनातील विचार प्रत्यक्ष कृतीत आणणारे पुरुषोत्तम फार थोडेच असतात. आपल हे मत व्यक्त करताना भंडारी यांनी काही प्रसंग आणि दृष्टांत यांचा आधार देऊन मांडले.आयुष्यात ज्यांना विचार, उच्चार आणि आचार याची सांगड घालणं जमल त्यांनाच खरी गीता कळली असा संदेश आजच्या पिढीला डॉ.भंडारी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमेय जोशी यानी केले. प्रास्ताविक सौ. मंजूषा तेलंग यांनी केले.समारोपाला गीतेची आरती सादर करण्यात आली. भारतमातेची आरती सुनंदा ताई जोशी यांच्या हस्ते करण्यातआली. आभार प्रदर्शन श्रीयुत सदानंद भिसे यांनी केले.या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन वसुधा साठे सौ ज्योती मुंगी, सौ सोनल जोशी यांनी केले. श्री तेलंग यांनी वंदे मातरम गीताने समारोप केला. त्यानंतर प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page