लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा तर्फे ऑक्टोबर सर्व्हिस वीकनिमित्त मोफत दंत तपासणी शिबिर








मावळ मराठा न्युज – लोणावळा,लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा यांच्या वतीने ऑक्टोबर सर्व्हिस वीक निमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून दि. १० व १२ ऑक्टोबर रोजी राज लेसर डेंटल केअर व डॉ. ओसवाल्स डेंटल क्लिनिक येथे मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तपासणीचे कार्य डॉ. रितेश खंडेलवाल व डॉ. संजम ओसवाल यांनी केले.या प्रसंगी क्लबच्या अध्यक्ष लायन कांता ओसवाल, सचिव निराली नालेकर, डॉ. दिलीप सुराणा, डॉ. पोपट ओसवाल, अभय जैन, अँड. प्रफुल लुंकड, रोहित थोरात, सुरुची खंडेलवाल, नंदकिशोर खंडेलवाल आदी मान्यवर उपस्थित होते.या उपक्रमाद्वारे उपस्थित डॉक्टरांनी नियमित दंत तपासणी व योग्य आहार यामुळे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात असा संदेश दिला.



