अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न कामशेत शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गणेश शिवराम लालगुडे यांची निवड







मावळ मराठा न्यूज़- वडगांव मावळ -अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न कामशेत शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कुसगाव येथिल पत्रकार गणेश शिवराम लालगुडे यांची एकमताने निवड करण्यात आली. पत्रकार परिषदेचे ज्येष्ठ नेते पत्रकार विजय सुराणा व अध्यक्ष सचिन ठाकर यांनी लालगुडे यांच्या नावाची घोषणा केली गणेश लालगुडे यांच्या सोबत उपाध्यक्षपदी सारा न्यूजचे प्रतिनिधी रमेश शिंदे यांची निवड करण्यात आली तर सचिव म्हणून जागृत मावळचे संपादक महेंद्र ओव्हाळ यांची निवड झाली. कामशेत शहरात सदस्य म्हणून सलीम शेख सचिन मोरे संजय गायकवाड विलास गायकवाड सारिका लालगुडे मंथन मोरे आदींची निवड झाली या नवीन कार्यकारिणीस पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या व नवीन पदाधिकार्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी राज्याचे विश्वस्त शरद पाबळे, मावळ तालुका पत्रकार संघांचे मुख्य सल्लागार ऍड संजय पाटील,तालुका कार्याध्यक्ष रेखा भेगडे सचिव महादेव वाघमारे पत्रकार परिषद प्रमुख सुभाष भांडे प्रकल्प प्रमुख दत्ता म्हाळस्कर आदी उपस्थित होते.



