लोणावळा कनिष्ठ महाविद्यालयाची वेटलिफ्टर कु.मेघा नवनाथ तावरे हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड


मावळ मराठा न्यूज :- लोणावळा-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा २०२३-२४ मध्ये १९ वर्षाखालील मुलींच्या गटात ८७ किलोवरील गटामध्ये कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय,वलवन (लोणावळा महाविद्यालय) ची विद्यार्थिनी कु.मेघा नवनाथ तावरे हिने सुवर्णपदक मिळविले असून सदर खेळाडूची निवड बिकानेर, राजस्थान येथे होणाऱ्या शालेय (नॅशनल) राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी झाली असून लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष अध्यक्ष श्री.रमेशचंद्र नैयर,सचिव ऍड.नीलिमा खिरे,उपाध्यक्ष दत्तात्रय पाळेकर, खजिनदार दत्तात्रय येवले,सहसचिव ऍड.अजय भोईर,विश्वस्त नंदकुमार वाळज,सुनील ठोबरे,आदींच्या वतीने सन्मान करण्यात आला तसेच कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक व विद्यार्थ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ.विलास पाटील उपस्थित होते.सदर विद्यार्थिनीस क्रीडाशिक्षक प्रा.दीपक तारे यांचे मार्गदर्शन तर जिमखाना विभागाचे श्री.तेजस भांगरे व आकाश गायकवाड, अतिश गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.सदर खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




