स्वच्छ” तळेगाव ,सुंदर तळेगाव”या लायन्स क्लब ऑफ तळेगावच्या सकल्पनेचा शुभारंभ २५० वृक्षारोपण करून उत्साहात संपन्न



मावळ मराठा न्यूज़ तळेगाव, लायन्स क्लब ऑफ तळेगावचे अध्यक्ष डॉ अनिकेत काळोखे,प्रकल्प अधिकारी ला. दीपक बाळसराफ यांनी ला. शैलेशभाईंच्या अर्थसहाय्यातून बुधवार दिनांक ५ जून २०२३ या दिवशी” हिंदमाता भुयारी रेल्वे” परिसरातील ऑक्सिजन पार्क येथे शुभारंभ संपन्न केला. तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री एन के पाटील यांनी महाराष्ट्र शासनाच्या विविध प्रकल्पाची माहिती देत या लायन्सच्या स्तुत्य प्रकल्पाला शुभेच्छा दिल्यात. प्रांतपाल ला. डॉ दीपकभाई शहा यांनी आंतरराष्ट्रीय लायन्स संघटनेच्या सेवा कार्याची माहिती उपस्थितांना दिली. लायन अध्यक्ष डॉ. अनिकेत काळोखे यांनी वृक्षांच्या- मुळापासून- पानापासून- फुलांपासून- फळांपासून मानवी जीवनाशी कसे नाते आहे हे आपल्या मनोगतात व्यक्त केले. उप मुख्याधिकारी ममता राठोड व उद्यान विभाग प्रमुख श्री सिद्धेश्वर महाजन यांनीही लाय न्स क्लब आणि तळेगाव नगरपरिषद भविष्यकाळात माझी वसुंधरा या उपक्रमात सतत एकत्रित कार्यरत असतील असे आश्वासन आपल्या शुभेच्छा व्यक्त करताना दिले. ज्येष्ठ ला. डॉक्टर शालिग्राम भंडारी यांनी ला .अध्यक्ष अनिकेत काळोखे आणि ज्येष्ठ ला. महेशभाई शहा यां उभयतांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना लायन परिवारातर्फे संवेदनशील काव्यपंक्तीत शुभेच्छा दिल्यात. त्याबरोबरच प्रकल्प प्रमुख ला दीपक बाळसराफ व त्यांच्या टीमचं हा उपक्रम शंभर टक्के यशस्वी केल्याबद्दल लायनतर्फे मनःपूर्वक अभिनंदन करून सर्वांचे आभार मानलेत. या समारंभाचे सूत्रसंचालन ला राधेश्याम भंडारी यांनी केले. या ऑक्सिजन पार्कची सर्वतोपरी निगा राखणाऱ्या श्री संजय निखळजे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यात बुडण्यापासून लाख मोलाचे जीव वाचवणाऱ्या श्री निलेश गराडे आणि दिव्यचक्षु आणि अत्यंत संवेदनशील श्री सोमाजी लांडे यांचाही यथोचित सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या समारंभास ज्येष्ठ ला सदस्य नंदकुमार काळोखे, ला. श्रीकांत लोमटे, ला. ला.मनोहर दाभाडे, ला.शेखर चौधरी, ला. सुनील वाळुंज, ला.प्रमिला वाळुंज, ला. भरत पोतदार, ला.मयूर राजगुरव , ला.अनिता बाळसराफ, ला. सुनंदा दाभाडे, ला.सचिनशहा ला. सेक्रेटरी सुचित्रा चौधरी.खजिनदार ला. प्रकाश पटेल या लायन सभासदांची उपस्थिती होती अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.




