लायन्स हेल्थ क्लबला डॉ. सुहास कानिटकर यांच्या सहकार्यातून जिम इक्विपमेंटचा उद्घघाटन समारंभ संपन्न


मावळ मराठा न्यूज:- तळेगांव,अष्टावधानी चेअरमन- लायन एडवोकेट मनोहर दाभाडेंनी हेल्थ क्लबचा संपूर्ण अहवाल आपल्या मनोगतात व्यक्त केला. त्यानंतर ज्येष्ठ लायन डॉ. शालिग्राम भंडारीं यांनी बॉडीशोत- मजुरी करून रोजीरोटी कमावणाऱ्या अमित कुमारने प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दलचं- मनापासून कौतुक केलं! याच बरोबर रोज सकाळी पेपर वाटून शिकणाऱ्या संदाब शेख यांचे मनःपूर्वक अभिनंदन केलं.दोघही गरीब विद्यार्थ्यांना हेल्थ क्लबतर्फे निशुल्क ट्रेनिंग दिलं जातं याचीही माहिती देण्यात आली! सन २००९ या यावर्षीचा तालुक्यातील-” लायनश्री चा”- सन्मान कल्पेश पाटील ने प्राप्त केला तर यावर्षीचा प्रतीक खांडभोर ने हा सन्मान पटकावला! प्रशिक्षक दत्ता तनपुरे आणि नेहाल परदेशी यांच्या तज्ञ मार्गदर्शनामुळेच हे यश आमच्या स्पर्धकांना प्राप्त होत म्हणून या समारंभात त्यांच विशेष कौतुक करण्यात आलं.आयुष्यातील कुठल्याही क्षेत्रात जर आपल्याला पत- पद आणि प्रतिष्ठा प्राप्तीसाठी आपण- निष्क्रियता- अनावश्यक निद्रा आणि परनिंदा या गोष्टी कटाक्षाने टाळण्यानेच वरील गोष्टी आपण प्राप्त करू शकतो! हे सुभाषितातून पुढे आपल्या मनोगतात डॉक्टरांनी स्पष्ट केले अनुदान प्रदान करणाऱ्या डॉक्टर कानिटरांच लायन संदीप काकडे नी विशेष आभार मानलेत! याबरोबरच- लायन सदस्य आणि हेल्थ क्लबचे तरुण लाभार्थी यांचेही संदीप यांनी आभार व्यक्त केले. मित्रांनो- या हेल्थ क्लब बरोबरच- बॅडमिंटन- टेबल टेनिस- योगा क्लास- लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी खुलेनाट्यगृह दादा दादी पार्क तसेच मुकेश बालोद्यान- लायन डॉ. दीपकभाई शहा आत्याधुनिक सभागृह! कराटे- डान्स क्लासाबरोबरच मागील ग्राउंडवर- उपलब्ध असलेल्या हुतुतू- खोखो- बास्केटबॉल आणि क्रिकेट अशा विविध क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंसाठी ग्राउंड उपलब्ध आहे याची माहिती उपस्थिताना देण्यात आली अल्पोपहाराने या समारंभाची सांगता झाली.अध्यक्ष मयूर राजगुरव यांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत केले

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page