लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोज च्या वतीने पाच प्रमुख ठिकाणी वाहतूक जागरूकता फलक









मावळ मराठा न्युज -लोणावळा,माननीय डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पीएमजेएफ ला. राजेशजी अग्रवाल,लायन्स क्लब लोणावळा सुप्रीमोज ने वाहतूक जागरूकता विषयक एक उपक्रम आयोजित केला.सेवा सप्ताहात आमच्या महासंचालकांनी दिलेल्या आदेशानुसार सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. लायन्स क्लब लोणावळा सुप्रीमोजने हा उपक्रम सलग २ दिवस आयोजित केला. दिनांक ११ ऑक्टोबर आणि १२ ऑक्टोबर २०२५ रोजी टीम लोणावळा सुप्रीमोज ने लोणावळ्यातील ५ प्रमुख ठिकाणी वाहतूक जागरूकता बॅनर लावले, सामान्य जनतेसाठी या वाहतूक जागरूकता कार्यक्रमात वाहतूक पोलिस आणि ट्रॅफिक वॉर्डन यांनाही सहभागी करून घेतले. हा उपक्रम क्लब अध्यक्ष एमजेएफ ला. सुरैया वाडीवाला यांच्या नेतृत्वाखाली दोन उपक्रम अध्यक्ष ला. धीरेंद्र चौकीकर,आणि ला. प्रसनजीत देब यांच्या सहकार्याने करण्यात आला.दोन वेगवेगळ्या दिवशी सदर उपक्रम राबविण्यात आला. ला. रंजना पुट्टोल,क्लब सचिव, ला. छाया वर्तक,क्लब कोषाध्यक्ष),ला. अपूर्व आणि अक्षय लोहार,एम.जे.एफ. ला. सुधीर जी कदम,डी.सी. मार्केटिंग आणि कम्युनिकेशन,. एमजेएफ ला.अमीन वाडीवाला,डी.सी. इमेज बिल्डिंग आदी मान्यवर उपस्थित होते.



