“महिला दिनानिमित्त आरोग्याची काळजी – थायरॉईड तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद”







मावळ मराठा न्युज – लोणावळा,लायन्स क्लब ऑफ लोणावळा–खंडाळा यांच्या वतीने महिला दिनानिमित्त अल्प दरात थायरॉईड तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून सुमारे ४० जणांनी या शिबिराचा लाभ घेतला. हे शिबिर डिस्ट्रिक्ट मेडिकल ऍक्टिव्हिटी चेअरमन डॉ. पोपट ओसवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. दिलीप सुराणा डॉ. लीना पॉन आणि डॉ. प्रणाली ओसवाल यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले. तसेच जनरल डायग्नोस्टिक या मेडिकल लॅबच्या मदतीने ही तपासणी करण्यात आली.शिबिर यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल क्लबच्या अध्यक्षा कांता ओसवाल यांनी सर्व डॉक्टर, सहकारी व लाभार्थी नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.



