लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा,मनशक्ती केंद्र आणि हिमगिरी ट्रस्ट लोणावळा यांच्या सौजन्याने कुरवंडे येथे मोफत आरोग्य शिबिर







मावळ मराठा न्युज – लोणावळा,दिनांक ११ नोव्हेंबर रोजी लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा,मनशक्ती लोणावळा आणि हिमगिरी ट्रस्ट लोणावळा यांच्या सौजन्याने कुरवंडे येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या वेळेस लायन्स क्लब लोणावळा खंडाळा चे डॉ. पोपट ओसवाल डॉ. सुराणा दिलीप डॉ गिरावले यांचेवतीने कोकण दिंडी रोहा मधील वारकरी ची मोफत तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे नियोजन सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर खंडेलवाल यांनी केले.
या वेळेस मनशक्ती केंद्र तर्फे औषधे मोफत देण्यात आली.यावेळेस मनशक्ती चे सनी परब लायन्स क्लब लोणावळा खंडाळा चे रोहितजी उपस्थित होते.



