डॉ. डी. वाय पाटील टेक्निकल कॅम्पस महाविद्यालयामध्ये“अप्टिटयूड व सॉफ्ट स्किल” ट्रेनींगचे आयोजन

मावळ मराठा न्युज :-तळेगाव (प्रतिनिधी)विद्यार्थ्याच्या करियरच्या दृष्टीने ‘अप्टिटयूड व सॉफ्ट स्किल’ या दोन्ही गोष्टीहीतितक्याच महत्त्वाच्या आहेत या अनुषंगाने डॉ. डी. वाय पाटील टेकनिकल कॅम्पस,वराळे, तळेगाव दाभाडे या महाविद्यालयामध्ये दि. ५ मार्च पासून खास एम सी ए च्या विद्यार्थ्यासाठी महाविद्यालयातर्फे अप्टिटयूड आणि सॉफ्टस्कील ट्रेनींगचे आयोजन करण्यात आले .यासाठी श्री. आशिष तिवारी यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्याना मिळाले. श्री आशिष तिवारी हे महिंदा प्राइड स्कूल आणि नांदी फाउंडेशन हैद्राबाद येथील ट्रेनर असून या ट्रेनींगसाठी ६० विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमामुळे मुलाखतीला कसे सामोरे जावे,मुलाखतीला जात असताना पोशाख कसा असावा यासारख्या सामान्य गोष्टीपासून ते चांगले पॅकेज कसे मिळवायचे याबददल आम्हाला माहिती मिळाली असा प्रतिसाद विद्यार्थीनींकडून मिळाला. महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. सुशांत पाटील आणि सी.ई.ओ. अडव्होकेट अनुजा पाटील यांच्या प्रेरणेतून ही संकल्पना यशस्वीपणे पार पाडण्यात आली. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. डी. शिरबहादूरकर व विभागप्रमुख डॉ. योगेश गुरव यांचे मार्गदर्शन लाभले . हा कार्यक्रम प्राध्यापक मनिष राउत, ट्रेनींग व प्लेसमेंट ऑफीसर प्राध्यापक आशिषजावके यांच्याद्वारे संपन्न झाला तसेच प्राध्यापक वैष्णवी भालकीकर, प्राध्यापक मेघाली गव्हाणे यांचे या कार्यक्रमात राबवण्यात मोलाचे योगदान मिळाले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page