लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोज च्या वतीने माय फर्स्ट स्टेप प्री-स्कूल,नांगरगाव येथे बाल दिवस रंगसंगती स्पर्धा घेऊन संपन्न

मावळ मराठा न्युज – लोणावळा बालदिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोजने गुरुवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी माय फर्स्ट स्टेप प्री-स्कूल,नांगरगाव, लोणावळा येथील ज्युनियर आणि सीनियर केजी विद्यार्थ्यांसाठी रंगसंगती स्पर्धा आयोजित केली. या शाळेतील ४० विद्यार्थ्यांनी या रंगसंगती स्पर्धेत भाग घेतला.ज्युनियर केजी मधील ३ विजेते विद्यार्थी आणि सिनियर केजी मधील ३ विजेत्यांना बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व ४० विद्यार्थ्यांना सहभागासाठी न्यूट्रिशन बार देण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मुनिरा रामपूरवाला शाळेत या स्पर्धेसाठी उपस्थित होत्या आणि त्यांची व्यवस्था करण्यात आली. एमजेएफ ला अमीन वाडीवाला यांनी मुख्याध्यापिकां सोबत या उपक्रमाचे समन्वय साधले.ज्याचे नेतृत्व क्लब अध्यक्ष पीएमजेएफ ला. सुरैया वाडीवाला यांनी केले. त्यानी सर्व बक्षिसे देखील प्रायोजित केली. प्रमाणपत्रे आणि न्यूट्रिशन बार देऊन बालदिन साजरा करण्यात आला.या उपक्रमासाठी ला.रंजना पुट्टोल (क्लब सचिव),ला. छाया वर्तक (क्लब कोषाध्यक्ष),ला.विश्वनाथ पुट्टोल, एमजेएफ ला. सुधीर कदम (डीसी मार्केटिंग अँड कम्युनिकेशन)तसेच ला.यशश्री तावरे ज्यांनी या स्पर्धेचे कौशल्याने परीक्षण केले.लोणावळा संघाचे प्रमुख माननीय डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page