लोणावळ्याचे संजय कडू यांना महाआरोग्य वारी २०२६ साठी लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान,७५ हून अधिक उत्कृष्ट उपचारकांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव

मावळ मराठा न्युज -पुणे,दि. २४ ऑगस्ट २०२६ आषाढी वारीच्या निमित्ताने झेप मल्टिमीडिया अल्टरनेटिव्ह मेडिसिन इन्स्टिट्यूट यांच्या वतीने आणि संजय कडू सर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या “महा आरोग्य वारी २०२६ ”या अभिनव आरोग्यसेवा उपक्रमाची London Book of World Records यांनी वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून नोंद केली आहे. या ऐतिहासिक कामगिरीनिमित्त प्रमाणपत्र वितरण व सन्मान सोहळा दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, पुणे येथे उत्साहात पार पडला.दि. ७ जुलै ते २६ जुलै २०२६ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रातून २५० हून अधिक प्रशिक्षित उपचारकांनी वारी मार्गावरील विविध ठिकाणी तसेच पंढरपूर येथे वारकऱ्यांची निःस्वार्थ आरोग्यसेवा केली. “बिना औषध, बिना गोळी – नैसर्गिक वेदनाशामक उपचार” या संकल्पनेतून या अभियाना दरम्यान तब्बल १ ,२० ,३५४ वारकऱ्यांना वेदनाशामक उपचारसेवा देण्यात आली.या उल्लेखनीय आणि समाजोपयोगी कार्याची दखल घेत London Book of World Records यांनी “महा आरोग्य वारी २०२६ ” या उपक्रमाची World Record म्हणून अधिकृत घोषणा केली. या उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ७५ हून अधिक उपचारकांना London Book of World Records यांच्या वतीने स्वतंत्र वैयक्तिक प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून महेश थोरवे, डायरेक्टर, MIT; डॉ. प्रिया, Founder Director, Metowe Mission; आनंद यादव, Treasurer, India Society for Study Incorporation; डॉ. अरविंद सकुंडे, International President, International Human Rights Ambassador Organization; HBP चंद्रकांत मोरे तसेच संजय गेणू कडू, Director, Zep Multimedia आणि National President, Paramparik Vaidya Association आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उपचारकांचा सन्मान करण्यात आला. वारकऱ्यांच्या आरोग्यसेवेसाठी उपचारकांनी दाखविलेला सेवाभाव, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी यांचे मान्यवरांनी कौतुक केले.“महा आरोग्य वारी २०२६ ” हा केवळ आरोग्यसेवेचा उपक्रम नसून सेवाभाव, मानवता आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी आदर्श ठरला असून, या विश्वविक्रमी उपक्रमामागील संकल्पना, नेतृत्व आणि सर्व उपचारकांचे योगदान विशेष कौतुकास्पद असल्याचे यावेळी गौरवोद्गार काढण्यात आले.सेवेतून आरोग्य… आरोग्यसेवेतून मानवता… आणि मानवसेवेतून विश्वविक्रम!

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page