महिला मंडळा लोणावळा चा वर्धपान दिन मोठया् उत्साहात साजरा








मावळ मराठा न्युज -लोणावळा,(श्रावणी कामत)महिला मंडळा लोणावळा चा वर्धपान दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्त नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक नगरसेविका यांचा सत्कार तसेच महिला मंडळ सदस्यांसाठी वेगवेगळ्या खेळाचे आयोजन करून करण्यात आला. याप्रसंगी बोलताना माननीय नगराध्यक्ष यांनी महिला मंडळांनी दिलेल्या कार्डयाक ॲम्बुलन्स च्या पत्राचा उल्लेख करून लवकरच लोणावळ्यामध्ये ही ॲम्बुलन्स दाखल होईल असे आश्वासन दिले . आलेल्या नगरसेविकांनी महिला मंडळाने केलेल्या सत्काराचे कौतुक केले . महिला मंडळाचे अध्यक्ष सौ मनीषा बंबोरी यांनी महिला मंडळ हे लोणावळ्यातील सर्व लोकांच्या आरोग्यासाठी भरपूर कार्यरत आहे हे सांगून महिला सबलीकरण आणि सशक्तीकरणासाठी नेहमी पुढाकार घेत राहील हे प्रतिपादन केले. महिला मंडळाचे उपाध्यक्ष मेधा वैद्य यांनी ईशस्तवन सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. महिला मंडळाच्या सर्व कार्यकारणीच्या हस्ते नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका आणि नगराध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सौ प्रतिमा खळदकर यांनी केले. महिला मंडळातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस सुलभा लांबट यांनी पटकवले तर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस शशी बोरटकर यांनी पटकावले. आलेल्या सर्वांना अल्पपोहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी नगरसेविका सौ दीपा अगरवाल,सौ आरती त्रिकोणे,सौ सोनाली मराठी, सौ अनिता अंभोरे, सौ वसुंधरा दुर्गे, सौ गायत्री रीले, सौ रेश्मा पाठारे, सौ स्वप्ना कदम,नगरसेवक श्री सनीभाऊ घोणे उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मंडळाच्या सर्व कार्यकारिणीने महत्त्वाची भूमिका बजावली. महिला मंडळाचे अध्यक्ष सौ मनीषा बंबोरी, उपाध्यक्ष सौ मेधा वैद्य, उपाध्यक्ष सौ उमा मेहता, सेक्रेटरी सौ प्रतिमा खळदकर, खजिनदार सो सुनीता रावण, सहखजिनदार सौ क्षुतिका राणे यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्तम पार पडला .



