हरवली आहे !!कुमारी श्रुति सुरेश पवार, वय- ०८ वर्ष,टिटवाळा,कल्याण येथून हरवली आहे
मावळ मराठा न्यूज -टिटवाळा, कुमारी श्रुति सुरेश पवार, वय- ०८ वर्ष, फ्लॅट नंबर ६०५,रामेश्वर बिल्डिंग, सावरकर नगर, टिटवाळा पुर्व ही सकाळी ०९:३५ वाजता चे सुमारास राहते घरातुन आजोबांचे सोबत जायचे आहे म्हणुन मागे लागली परंतु आजोबा गाडी घेऊन निघुन गेले त्या दरम्यान ती गाडीचे मागे निघुन गेली ती परत आली नाही. सदर मुलगी रेल्वे ने टिटवाळा येथुन कोठेतरी गेली असावी अगर टिटवाळा शहरात फिरत असावी तरी सदर मुलगी मिळुन आल्यास कल्याण तालुका पो स्टे येथे संपर्क करावा. पोलीस निरीक्षक गिरी मोबाईल न. ९९२२४ ४१३१४ ,८२९१७०४७०८ कळवावे




