लोणावळा परिसरात ९० दिवसांच्या मोफत योग उपक्रमाचा दुसरा टप्पा सुरू

मावळ मराठा न्युज -लोनावळा :सूक्ष्म – द स्कूल ऑफ योगा अँड ऑकल्ट सायन्सेस यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या ९० दिवसांच्या मोफत योग उपक्रमाचा पहिला टप्पा मोठ्या यशाने पूर्ण झाला आहे. या उपक्रमामागील संस्थापक व दूरदर्शी मार्गदर्शक (Founder & Visionary) पंकज शर्मा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला गेला आहे.पहिल्या टप्प्यात १६० हून अधिक महिलांनी नोंदणी केली, तर त्यापैकी १२० पेक्षा अधिक महिलांनी नियमितपणे योगाभ्यास सुरू ठेवत आपल्या आरोग्याबाबतची दृढ बांधिलकी दाखवली. या सकारात्मक प्रतिसादानंतर आता दुसऱ्या टप्प्याची सुरुवात १५ जानेवारीपासून करण्यात येत आहे. या उपक्रमाला “योग सेवा अभियान – टप्पा २” असे नाव देण्यात आले असून, हा उपक्रम महिला मंडळ, लोनावळा यांच्या सहकार्याने (Co-powered by Mahila Mandal, Lonavla) राबविण्यात येत आहे.दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी होणाऱ्या मोफत योग सत्रांचे आयोजन लोनावळा व परिसरातील शहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. योग व मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणे आणि सातत्यपूर्ण साधनेचे महत्त्व प्रत्येकापर्यंत पोहोचवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.दुसऱ्या टप्प्यातील सत्रांचे तपशील —🔹 वेळ :पहिला बॅच – सायं. ४.०० ते ५.००दुसरा बॅच – सायं. ५.३० ते ६.३०🔹 स्थळ :सुमित्रा हॉल, भांगरवाडी, लोनावळायावेळी बोलताना पंकज शर्मा म्हणाले,“योग ही विक्रीसाठीची वस्तू (commodity) नसून ती समाजासाठीची एक सेवा आणि मूलभूत गरज आहे. वाढता तणाव, चिंता आणि मानसिक अस्वस्थता पाहता योग प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे ही आमची सामाजिक जबाबदारी आहे. सातत्यपूर्ण साधनेतूनच खरा परिवर्तन घडतो.”योगासन, प्राणायाम, ध्यान व मानसिक संतुलनावर आधारित ‘योग सेवा अभियान – टप्पा २’ हा उपक्रम लोनावळा व परिसरात आरोग्यदायी, जागरूक व संतुलित समाज घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page