शिवदुर्ग रेस्क्यू टीमला लोणावळा ग्रामीण पोलीस यांचेकडून ५१ हजार रुपयाचे रेस्क्यूसाठी लागणारे दोर आणि इतर साहित्य भेट

मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळा व परिसरात दुर्गम भागात जाऊन रेस्क्यू करणारे शिवदुर्ग रेस्क्यू टीम लोणावळा यांच्या समाजकार्यात मदत म्हणून लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सन २०२५ मधील गणेश उत्सव खर्चात काटकसर करून गणेश उत्सवातील अवांतर खर्च टाळून शिल्लक राहिलेल्या ५१ हजार रुपये रकमेतून शिवदुर्ग रेस्क्यू टीम लोणावळा, यांना त्यांचे रेस्क्यू वेळी लागणारे दोर व इतर साहित्य आज दिनांक १६/११/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक श्री दिनेश तायडे व लोणावळा ग्रामीण पोलीस स्टाफ यांच्यावतीने शिवदुर्ग रेस्क्यू टीम लोणावळा चे उपाध्यक्ष श्री महेश मसने, सचिव श्री सुनील गायकवाड,संचालक राजेंद्र कडु व चंद्रकांत गाडे यांना सुपूर्द करण्यात आले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page