पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस आयोजित,वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा अंतर्गत,दुसरे पर्व,लोणावळातील इंद्रायणी नदी,महापुरुष यांच्या पुतळ्याची स्वछता





मावळ मराठा न्युज, लोणावळा :-पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस आयोजित,वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा,गड किल्ले स्वच्छता अभियान आणि इंद्रायणी नदी व महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वछता पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोणावला उप विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आय पी एस सत्यसाई कार्तिक यांच्या संकल्पनेतून सदर स्वछता अभियानाला छत्रपती शिवाजी महाराज चौक, लोणावळा येथून सुरुवात करण्यात आली.यावेळी लोणावळा नगरपरिषद,आय एन एस शिवाजी,शिवदुर्ग मित्र,सिहंगड महाविद्यालय,डी वाय पाटील विद्यालय, लोणावळ्यातील पत्रकार, वडगांवचे पोलीस निरीक्षक कुमार कदम,कामशेतचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ,लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सीताराम डूबल,लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे,उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी,पोलीस कर्मचारी,लोणावला नगरपरिषद कर्मचारी सामाजिक संस्था आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी सत्यसाई कार्तिक आणि मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी अभियानाबद्दल एम एन न्यूज ला माहिती देताना सांगितले इंद्रायणी नदी ची स्वछता शासनाच्या योजने अंतर्गत नियमित केली जाईल तसेच लोणावळ्यातील १२ प्रभागातील दार दिवशी एक याप्रमाणे संपूर्ण लोणावळा शहरात स्वछता अभियान राबविण्यात येईल.




