सारिका सुनील शेळके यांचा वाढदिवस लोणावळा शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेस आणि महिला लीगल सेल केला अनाथासोबत साजरा

मावळ मराठा न्यूज: – लोणावळा,आपले लाडके मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या सौभाग्यवती तसेच आधारस्तंभ व मार्गदर्शिका तसेच संस्थापिका अध्यक्ष कुलस्वामिनी महिला मंच,मावळ सौ सारिका शेळके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी युवती काँग्रेस व राष्ट्रवादी महिला लीगल सेल लोणावळा शहर यांच्यातर्फे संपर्क बालग्राम बाल आशा घर नांदगाव येथे गरजूना साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच शिक्षण आणि खेळाचे महत्व या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलेकार्यक्रमास लोणावळा शहर युवती अध्यक्ष ॲड. गायत्री रिले , लोणावळा शहर युवती कार्याध्यक्ष नेहा युवराज पवार, वरिष्ठ उपाध्यक्ष स्वप्ना अतुल कदम व लोणावळा शहर लीगल सेल अध्यक्ष पूजा बुटाला यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.बालग्राम व्यवस्थापक संजय कानवडे ,अकाउंटंट मच्छिंद्र दराडे, कौन्सिलर रवींद्र कांबळे, हाऊस मदर साधना संचेती, तसेच केतकर सूर्यभान कोठवळ उपस्थित होते.आपले आजचे शिक्षण आणि खेळाचे महत्व या विषयावर श्रुतिका धारकप मार्गदर्शन केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page