मध्यमवर्गीय माणसासाठी उपयुक्त असे बजेट – सीए प्राजक्ता हृषिकेश चिंचोळकर


मावळ मराठा न्यूज:-सरकारने सबका विकास, सबका प्रयास या त्यांच्या वचनाला जागत मध्यमवर्गीय माणसासाठी उपयुक्त असे बजेट दिले आहे.टॅक्सेशनची नवीन स्कीम जास्त आकर्षक केली गेली असून अपरिहार्यपणे सगळ्यांना ती लागू होणार आहे. पगारदात्यांना नवीन स्कीम प्रमाणे ५०००० रुपयांच्या स्टॅंडर्ड डिडक्शनची अतिरिक्त सुविधा दिली गेली आहे. उच्च वर्गातील कॅपिटल गेन धारकांसाठी सरकारची भूमिका मांडली गेली असून, यामध्ये सेक्शन ५४ व ५४ एफ यात दहा कोटी पर्यंत ची मर्यादा टाकण्यात आली आहे. आत्मनिर्भर भारत या योजनेला अनुसरून छोट्या व्यावसायिकांसाठी दिलासादायक निर्णय या बजेटमध्ये आहे.विशिष्ट मर्यादेमध्ये मायक्रो स्मॉल आणि मिडीयम स्केल एंटरप्राइजेस चा परतावा न दिल्यास सेक्शन ४३ब नुसार जेव्हा परतावा दिला जाईल तेव्हा त्याची वजावट मिळणार आहे.



