लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा यांच्या वतीने डेला फाऊंडेशन जिल्हा परिषद शाळेत बाल दिन साजरा







मावळ मराठा न्युज – लोणावळा,बालदिना चे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा ह्यांनी कुणे गांव येथील डेला फाऊंडेशन जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत बालदिन साजरा केला. शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती अश्विनी अंकित मानकर व सहकर्मचारी शिक्षिका श्रीमती रचना ताई, श्रीमती सुवर्णा कुंभार, श्रीमती सुरेखा लांडगे आणि श्रीमती अंजली सेठी ह्यांच्या सहकार्याने लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा च्या क्लब च्या अध्यक्षा लायन कांताजी ओसवाल, सचिव निराली नाळेकर, खजिनदार लायन अश्विनी कदम, लायन जयश्री सुराणा, लायन रंजु लुणावत, लायन रिम्पल पटवा,लायन अभय जैन, लायन प्रकाश जैन आणि लायन डॉ पोपट ओसवाल ह्या सर्व गणमान्यांच्या उपस्थितीत आणि सर्व विद्यार्थ्यांना विविध विषयांवर इनडोअर गेम्स चे आयोजन लायन निराली नाळेकर ह्यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ चे वाटप करण्यात आले.खेळात विजयी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.



