रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने नगरपरिषद माध्यमिक विद्यालय येथे कॉम्प्युटर मशीनद्वारे मोफत डोळे तपासणी,मोफत चष्मावाटप शिबिर






मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालय येथे शनिवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांच्यावतीने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर मशीनद्वारे मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मावाटप शिबिर ठेवण्यात आले होते.या उपक्रमात साधारण २०० गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या उपक्रमासाठी रोटरी क्लबच्या अध्यक्ष रोटेरियन विजया कल्याण, रो. नितीन कल्याण, रो.नारायण शारवाले रो.रवींद्र कुलकर्णी. जयस्वाल ऑप्टिशियन, लोणावळा चे संजय जयस्वाल व त्यांचे सहकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. तर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बलकवडे सर यांनी हा उपक्रम घेण्यासाठी विशेष पाठपुरावा केला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उर्दू विद्यालय मुख्याध्यापक श्री सईद सर,श्री. पठाण सर, श्री. सूर्यवंशी सर, श्रद्धा मंगवडे, साक्षी नलावडे, सुषमा जाधव, पुष्पा हारपुडे यांनी विशेष परिश्रम घेतले.




