कुसगावमध्ये महिलांसाठी व्यवसाय विकास प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न

मावळ मराठा न्युज- कुसगाव -दि. २१ नोव्हेंबर २०२५, कुसगाव बु.हॅन्ड इन हॅन्ड इंडिया, नॉर्मेट इंडिया प्रा. लि.आणि कुसगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कुसगाव बु. येथे मेहंदी प्रशिक्षण व व्यवसाय विकास प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात एकूण ५० महिलांनी सहभाग नोंदवला.कार्यक्रमाची सुरुवात व सूत्रसंचालन हॅन्ड इन हॅन्ड इंडियाच्या जिल्हा समन्वयक सारिका शिंदे यांनी केले. त्यानंतर संस्थेचे श्री.ओंकार कुलकर्णी यांनी कुसगाव ग्रामपंचायत क्षेत्रात संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली व महिलांशी सविस्तर संवाद साधला.महिलांना व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी, व्यवसाय कसा वाढवायचा, नवीन संकल्पना अवलंबून उद्योजकता कशी बळकट करायची याबाबत मार्गदर्शन राज्य समन्वयक परमेश्वर कांबळे यांनी केले. एक व्यवसायिक महिला किती आत्मनिर्भर होऊ शकते याचे प्रेरणादायी मार्गदर्शनही त्यांनी दिले.मेहंदी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाला कुसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी गुंड, सदस्य फरीन शेख, सुजाता ठुले यांची उपस्थिती लाभली. हॅन्ड इन हॅन्ड इंडियाकडून ओंकार कुलकर्णी, परमेश्वर कांबळे, कविता ढोकरे, सारिका शिंदे, अंजुम शेख, पंढरीनाथ बालगुडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page