वटपोर्णिमा निमित्त लोणावळा नगरपरिषद व कॅनरा बँक लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने रायवूड परिसरात वृक्षारोपण

मावळ मराठा न्युज -लोणावळा,दिनांक १० जून २०२५ रोजी सिद्धेश्वर मंदिर रायवूड परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी वड, पिंपळ आणि ताम्हण अशा तीन प्रकारच्या झाडांचे प्रत्येकी १० असे एकूण ३० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.वृक्षारोपण कार्यक्रमाच्या वेळी कॅनरा बँक लोणावळा शाखेचे मॅनेजर श्री. अभिषेक जैन, लोणावळा नगरपरिषदेचे लेखापाल श्री. सतिश गावडे, उद्यान विभाग प्रमुख श्री. जितेंद्र राऊत, शहर समन्वयक श्री. विवेक फडतरे, भरत गायकवाड आणि इतर कर्मचारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे पर्यवेक्षक श्री. एच. डी माने उपस्थित होते.वटपोर्णिमा म्हणजेच वृक्षांची महत्त्वपूर्णता सांगणारा दिवस आहे, आणि या कार्यक्रमाने पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून या वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले असे मत याप्रसंगी लोणावळा नगरपरिषदे मार्फत व्यक्त करण्यात आले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page