रोटरी क्लब ऑफ लोणावळाने आगळा वेगळा उपक्रम राबवत जपली सामाजिक बांधिलकी




मावळ मराठा न्युज :-लोणावळा,दिनांक -२०/४/२४ रोजी रोटरी क्लब लोणावळा तर्फे लोणावळा नगरी चे गाईड शेलार मामा यांना रोटरी तर्फे रोटरी टी शर्ट्स व कॅप देण्यात आली. लोणावळा रोटरी टुरिस्ट गाईड असे लिहलेले शर्ट देण्यात आले.तसेच लोणावळा नगरी मधील भटकी कुत्री यांना रोटरी क्लब ऑफ लोणावळा चे गळ्यातील पट्टा रेडियम पट्टी लावली त्यामुळे रोडवर रेडियम पट्टी मुळे अपघात होणार नाही याची काळजी मोटार वाहन चालक घेतील.यावेळी रोटरी प्रेसिडेंट दिलीप पवार,विजया कल्याण ,रो.नारायण ,रो .दामले ,रोनितीन ,रो.धीरूभाई ,रो.वानखेडे ,रविवारी,रो.नलावडे . रो.शंकर आणि शिवदुर्ग मित्र मंडळ व सेक्रेटरी सुनील गायकवाड,अबोली वाकडकर, हर्षल चौधरी , प्रिन्स कुमार आदी हजर होते.




