चि. हेरंब अभिनंदन कुमठेकर याने साम्बो मध्ये सुवर्ण पदक पटकावले


मावळ मराठा न्यूज:- प्राधिकरण, निगडी-(प्रतिनिधी) छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे राष्ट्रीय साम्बो (रशियन कुस्ती) स्पर्धा २०२३-२४ पार पडली. या स्पर्धेत भारतातील २३ राज्यांनी भाग घेतला. महाराष्ट्रातील एकूण ४६ संघांनी भाग घेतला. न्यू पुणे पब्लिक स्कूल निगडी प्राधिकरण च्या शाळेनेसंघ म्हणून पहिला क्रमांक पटकावला. चि. हेरंब अभिनंदन कुमठेकर याने सुवर्ण पदक जिंकले. डॉक्टर अभिनंदन आणि उद्योजिका सुप्रिया कुमठेकर यांचा तो मुलगा आहे. तर ज्येष्ठ कवी, पत्रकार बाबू डिसोजा कुमठेकर यांचा तो नातू आहे. त्याने मिळविलेल्या यशाबद्दल संचालक,शिक्षक, पत्रकार यांनी त्याचे अभिनंदन केले.



