कल्हाट मावळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्वा शिवराज्याभिषेक दिन व गणेशराव कल्हटकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीर


मावळ मराठा न्यूज, कल्हट मावळ:-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्वा शिव राज्याभिषेक दिन व गणेशराव बबन कल्हटकर यांच्या वाढदिवसानिमित्त कल्हाट मावळ येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले,शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.यावेळी १० वी बारावी मध्ये चांगले यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि सोनी मराठी वरील ज्ञानेश्वर माऊली फेम सौरभ शेटे यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी अध्यक्ष भाजपा अंदर मावळचे गणेशराव बबनराव कल्हाटकर,माजी चेअरमन नथुशेठ करवंदे , माजी उपसरपंच सुभाषशेठ पवार, रवीशेठ पवार तज्ञ संचलक, निगडे सोसायटी,नवनाथ भगवान कल्हाटकर, शरद देशमुख, श्रीरंग पवळे, शंकरशेठ कल्हाटकर, माजी उपसरपंच बबनजी अजिवले, परशुरामजी करवंदे, काळुशेठ पवार, दत्ताशेठ कल्हाटकर, हभप शिवाजी महाराज आगीवले, माजी उपसरपंच प्रणालीताई आगीवले , सारिकाताई थरकुडे, बंडूशेठ पवार, कोंडीबा पवार, शिवाजी करवंदे, जालिंदर करवंदे आदी मान्यवर कल्हाट गावचे ग्रामस्थ व शिवस्वराज्य ग्रुप कल्हाट चे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.




