देवा भाऊ पाठीशी आहे,कुणाला कितीही पैसा वाटू द्या, टीका करू द्या,गिरीश कांबळे सह भाजपचे उमदेवार विजयी होतील – प्रसाद लाड








मावळ मराठा न्युज – लोणावळा – लोणावळा नगरपरिषद निवडणूक २०२५ उद्या होणाऱ्या निवडणुकीत लोणावळ्यात भाजपच कमळच येईल असा विश्वास भाजप चे नेते प्रसाद लाड यांनी भाजप नगराध्यक्ष पदाचे गिरीश कांबळे,नांगरगाव मधून भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार बिंद्रा गणात्रा,सुभाष डेनकर,आणि प्रभाग ९ मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत आशिष बुटाला १०० टक्के विजयी होतील आणि चित्रा ताई वाघ,प्रवीण भाऊ दरेकर आम्ही सर्व तुमच्या विजयी मिरवणूक साठी गुलाल उधळायला नक्की येऊ असा विश्वास व्यक्त करत सर्वाना शुभेच्छा दिल्या.विरोधकांना किती ही पॆसा वाटू द्या लोणावळेकर नागरिक यांचा देवाभाऊ यांच्यावर पूर्ण विश्वास आहे कारण देवाभाऊ म्हणजे भाजप कडे विकासाचे व्हिजन आहे.कुणाला कितीही टीका करू द्या आपला विजय नक्की आहे असा विश्वास प्रसाद लाड यांनी यावेळी व्यक्त केला.



