लोणावळा नगरपरिदेच्या ढिसाळ आणि गहाळ कारभारावर लोणावळेकरानीं केला संताप व्यक्त.

मावळ मराठा न्युज – लोणावळा,भांगरवाडी येथील निशीगंधा सोसायटी प्रमाणेच लोणावळ्यात बहुतेक सोसायट्यामध्ये रविवारी झालेल्या अचानक पावसामुळेलोणावळ्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले. भांगरवाडी येथील निशिगंधा सोसायटी, तुंगार्ली येथील बद्री विशाल सोसायटी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीच साचले होते. गवळीवाडा परिसरातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले. जुना खंडाळा येथे देखील काही घरांत पाणी घुसल्याने रहिवाशी्यांना त्रास सहन करावा लागला. अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने ही समस्या उदभवली असली तरी लोणावळा नगर परिषद प्रशासनाने अनेक ठिकाणी मान्सून पूर्व तयारी न केल्याने तसेच नाले सफाई योग्य प्रकारे केली नसल्याने आणि जे नैसर्गिक नाले अडवले गेले आहेत अशा ठिकाणी कारवाई करत नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत मोकळे करावेत अशी मागणी भाजपाचे गटनेते व माजी नगरसेवक देविदास कडू, माजी नगरसेवक दत्तात्रय येवले,संजय गोळपकर,भगवान आंबेकर आदींनी केली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page