पिंपरी चिंचवड शहर मानवी हक्क संरक्षण,जागृती संस्थेच्या उपाध्यक्षपदी पै.काळुराम लांडगे यांची एकमताने निवड,मानव अधिकार २०२५ पुरस्कार प्रदान







मावळ मराठा न्युज -पुणे,दि.१०.१२.२०२५ पिंपरी चिंचवड शहर मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेच्या उपाध्यक्षपदी पै.काळुराम लांडगे यांची एकमताने निवड करुन त्यांना मानव अधिकार २०२५ पुरस्कार बहाल करण्यात आला.आज मानवी हक्क संरक्षण आणि जागृृती संस्था , पुणे जिल्हा विधी सेवा प्राधीकरण आणि जाधवर लॉ – कॉलेज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मानवी हक्क संरक्षण दिनानिमित्त जागर मानवी हक्कांचा – जनजागृती अभियान यांचे अवचित्त साधून पुण्यातील – जाधवर लॉ कॉलेज , पुणे , यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज , श्री.शिवाजी मराठा लॉ कॉलेज , सुर्यदत्ता लॉ कॉलेज , मॉर्डन लॉ कॉलेज , पुणे , या विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थी पथनाट्यातुन जनजागृती दुपारी .३.३० ते ०५.३० वाजता स्वारगेट येथे पथनाट्य साजरे करुन संध्याकाळी ०६.०० वाजता मराठा चेंबर अॉफ कॉमर्स टिळक रोड पद्यमजी सभागृह येथे विविध सामाजिक क्षेत्रात कार्य केल्यामुळे ६ पुरस्कार्थी व १० सामाजिक संस्थांना विशेष पुरस्कार देण्यात त्यामध्ये कासारवाडीचे सुपुत्र पैलवान *काळुराम लांडगे यांना क्रिडा , शैक्षणिक , धार्मिक , आरोग्य विषयक , सांस्कृतिक , राजकिय , साहित्यिक असे विविध क्षेत्रात उल्लेखनिय समाजकार्य केल्यामुळे त्यांना पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुण्याचे अध्यक्ष , व पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीशचे प्रमुख मा.महेंद्र के. महाजन साहेब , पुणे जिल्हा विधी सेवा प्राधीकरणचे सचिव मा.न्यायधीश आर.आर. देशपांडे मॅडम , निवृत्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.आर.व्ही.जटाळे साहेब यांच्या शुभहस्ते *पैलवान काळुराम लांडगे यांना *” मानव अधिकार पुरस्कार २०२५ “* सन्मानचिन्ह व भारतीय संविधान पुस्तक तसेच मानवी हक्क संरक्षण आणि जागृती सस्थेचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र सन्मानिय प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते देण्यात आले.याळेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.विकास कुचेकर , व्यवस्थापन समितीचे मा.सदस्य – सावित्रीबाई फुले विद्यापीठ , जाधवर ग्रुप अॉफ इन्स्टिट्यूट चे उपाध्यक्ष मा.अॅड. शार्दुल जाधवर , संचालक आण्णा जोगदंड , पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा संगीता जोगदंड , पिंपरी चिंचवडच्या अध्यक्षा मीना करंजावणे , खेडचे अध्यक्ष – श्री.शंकर नाणेकर उपस्थित होते कार्यक्रमाला पुरस्कार्थींच्या नातेवाईकांनी व लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भरपुर गर्दी केली.कार्यक्रम संपूर्ण पारपाडण्यासाठी मानवी हक्क सरंक्षण आणि जागृती संस्थेच्या सर्व टिमने प्रयत्न केले.



