भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती वडगाव मावळ न्यायमंदिरात मोठ्या दिमाखात साजरी



मावळ मराठा न्यूज:- वडगाव,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन वडगाव मावळ न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उम्रेडकर आणि जेष्ठ विधिज्ञ गाडे यांचे हस्ते करून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले .यावेळी न्यायाधीश श्री अगरवाल तसेच कातकर, बर्गे, पाटील तसेच वडगाव मावळ वकील बार असोसिएशन चे विद्यमान अध्यक्ष संजय वांद्रे यांचे संकल्पनेने भारतीय संविधान उद्देशिका मुख्य प्रवेशद्वार समोर लावून भीमजयंती ची सुरवात करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कमिटी यांचे वतीने वडगाव मावळ न्यायालयाचे ग्रंथालयास पुस्तके भेट देण्यात आली. या करिता ॲड अमित गायकवाड ॲड अभय पळनिटकर ॲड मिलिंद ओव्हाळ ॲड सुरज देसाई ॲड राजेश देसाई ॲड अमोल पी देसाई ॲड अमोल देसाई ॲड सुरेश गावडे ॲड योगेश गायकवाड ॲड आशिष जाधव यांनी विशेष सहकार्य केले व पुस्तकांसारखे मित्र उपलब्ध केले व सर्व न्यायाधीश यांस भारतीय संविधान भेट देऊन संविधान आणि डॉ बाबासाहेब आंबडेकर यांचे प्रति कृज्ञता व्यक्त केली.




