जैन नारीशक्ती,लोणावळा आयोजित महावीर की रोटी उपक्रमांतर्गत अक्षय तृतीयानिमित्त उसाच्या रसाचे मोफत वाटप

मावळ मराठा न्युज – लोणावळा,जैन नारीशक्ती,लोणावळा आयोजित महावीर की रोटी उपक्रमांतर्गत अक्षय तृतीयेचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी उसाच्या रसाचे मोफत वाटप करण्यात आले. याची सुरुवात वर्षीतपआराधिका सौ सपना रोमितजी संचेती यांच्या हस्ते करण्यात आली. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी सौ मनीषा बंबोरी,सोनल ओसवाल, सौ सविता भुरट, सौ लीना ओसवाल यांचे सहकार्य लाभले. विशेष म्हणजे हा उपक्रम सुरू असताना अन्य दोन व्यक्तींनी स्वतःहून त्या ठिकाणी या उपक्रमात सहभाग घेतला व आपले योगदान या उपक्रमासाठी दिले. लोकांमध्ये दानधर्माची भावना वाढली आणि महावीरांची शिकवण सार्थकी लागली असे मनोगत सौ मनीषा बंबोरी यांनी व्यक्त केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page