पुणे विभाग (लोणावळा PUN-050) शिक्षक आणि पदवीधर मग मतदार संघाची प्रारूप मतदार यादी बाबत शिक्षकांची बैठक








मावळ मराठा न्युज -लोणावळा,आज शुक्रवार दि.१२/१२/२०२५ रोजी लोणावळा नगरपरिषदेचे मा.मुख्याधिकारी श्री.अशोक साबळे यांनी लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालय लोणावळा व लोणावळा नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालय लोणावळा मधील शिक्षकांची मिटिंग घेऊन पुणे विभाग (लोणावळा PUN-050) शिक्षक मतदार संघ मतदार नोंदणी कार्यक्रम अंतर्गत मतदार नोंदणी अधिनियम १९६० मधील नियम १० मधील (नमुना ५) मध्ये पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाची प्रारूप मतदार यादी बाबत विस्तुत माहिती दिली. तसेच सदरची प्रारुप मतदार यादी ऑक्झीलियम कॉन्व्हेंट हायस्कूल,रायवूड व लोणावळा नगरपरिषद कार्यालय यांचे नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच ज्या शिक्षक व पदवीधर मतदार यांना या प्रारुप मतदार यादीबाबत काही आक्षेप असतील तर ऑक्झीलियम कॉन्व्हेंट हायस्कूल, रायवूड व लोणावळा नगरपरिषद कार्यालयात दिनांक १८/१२/२०२५ पर्यंत लेखी स्वरूपात नोंदवण्यात यावेत तसेच अधिक माहितीसाठी श्री. सतीश दंडवते (९४२११३३३३१), श्रीमती विद्या कर्चे (७३८७७३१४८७) यांचेशी संपर्क करावा असे आवाहन केले व शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणी बाबत मार्गदर्शन तसेच जनजागृती केली.



