डोंगरगाव येथील आदिवासी पाड्यावर तब्बल ४० वर्षानंतर वीज,ग्रामस्थ्यांचा आनंदाला उधान








मावळ मराठा न्युज -लोणावळा,लोणावळ्यातील आदिवासी पाड्यावर तब्बल ४० वर्षानंतर वीज आली आहे. ४ दशकानंतर गावात वीजपुरवठा झाल्याने नागरिकांना खूप आनंद झाला आहे.लोणावळा परिसरातील अतिशय दुर्गम भाग असलेल्या आदिवासी पाड्यावर तब्बल चाळीस वर्षांनंतर वीज पोहचली आहे. जवळपास ४० वर्षे हे गाव अंधारात होते. ४० वर्षानंतर आदिवासी पाड्यावर वीज सुरू झाल्याने ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण आले आहे. या गावातील ३५ कुटुंबीयांचे स्वप्न पूर्ण झाले.गेल्या चार दशकांपासून ग्रामस्थांकडून वीजपुरवठ्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मात्र DPPC मधून अनुदान उपलब्ध न झाल्याने या कामाला वारंवार विलंब होत होता. अखेर या कामासाठी नवीन ५८ विद्युत वाहक पोल्सना मंजुरी मिळाली आणि प्रत्यक्ष कामाला गती मिळाली. आमदार सुनिल शेळके यांनी पुढाकार घेत आवश्यक अनुदान उपलब्ध करून दिल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच वेताळनगरमध्ये वीज पोहोचू शकली, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.वीज आल्याने शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा तसेच दैनंदिन जीवनात मोठा बदल होणार असून, ग्रामस्थांनी आमदार सुनिल शेळके यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. वेताळनगरसा हा दिवस ऐतिहासिक ठरला असून, विकासाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत डोंगरगाव , वेताळनगर, गेली ३५-४० वर्ष अंधारात होती, आपण Dpdc मधून स्वतत्र ट्रान्सफर व विद्युत पोलची कामाची मंजुरी घेतली व २ वर्ष आमदार सुनील शेळके यांच्याकडे डोंगरगाव चे सरपंच सुनील येवले आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी पाठपुरावा केला, आमदारसुनील शेळके यांनी Dpdc मधून निधी उपलब्ध करून दिला.



