मन की बात १०० एपिसोड निमित्त जेष्ठ नागरिक संघ विरंगुळा केंद्रात आयोजन


मावळ मराठा न्यूज, लोणावळा :-शतकपूर्ती सोहळा अतिशय उत्साहात आणि दिमाखात साजरा झाला. आमच्या लोणावळा ज्येष्ठ नागरिक संघ विरंगुळा केंद्रमध्ये जिवंत देखावे सादर करून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.ह्या कार्यक्रमास मार्गदर्शन , पुणे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य ज्येष्ठ नेते अविनाश बवरे ह्यांचे लाभले. तसेच कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी नगरसेवक राजाभाऊ खळदकर, माजी नगरसेवक देविदास कडू, ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक श्री. अरविंद कुळकर्णी, पत्रकार कुमठेकर , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नामदेव डफळ आदी अनेक मान्यवरांचे आर्शिवाद लाभले.कार्यक्रमानंतर अल्पोपहाराचा आस्वाद सर्वांनी घेतला.संपूर्ण संकल्पना माझी स्वतःची असून ह्या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. पांडुरंग तिखे खजिनदार श्रीं गोरख चौधरी, श्री. प्रमोद बंन्सल, श्री. सचिन रहाळकर, श्री. किशोर पंड्या तसेच माझ्या सर्व सहकारी मृदुला पाटील, संध्या गव्हले,धारप, लांबट, माधुरी काकू शैला, मंगल, शारदा, सरोज, ज्योती, प्रतिक्षा, रश्मी, विजया, दिपाली वाकडकर आणि सर्व शाळकरी मुला मुलींचे मोलाचे सहकार्य लाभले त्यासाठी सर्वांचे खूप खूप आभार मानण्यात आले.




