कापडी पिशवी घरोघरी,पर्यावरणाचे रक्षण करी उपक्रमा अंतर्गत रोटरी क्लब ऑफ लोणावळा तर्फे हळदी कुंकू


मावळ मराठा न्यूज:-लोणावळा,दिनांक २७ जानेवारी २०२३ , शुक्रवार रोजी रोटरी क्लब लोणावळा तर्फे हळदीकुंकू चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ३५० महिलांनी अतिशय उत्साहाने भाग घेतला. या वेळी संक्रांतीचे वाण म्हणून रोटरीची पर्यावरण पूरक अशी कापडी पिशवी भेट म्हणून देण्यात आली. या उपक्रमाचे नियोजन रो. फर्स्ट लेडी सौ. श्वेता मेहता व सौ.शरयू कुलकर्णी यांनी केले तसेच रो. सौ नंदिनी बॅनर्जी, रो. सौ. ब्रिंदा गणात्रा, रो .सौ वैशाली साखरेकर, रो सौ विजया कल्याण व सौ. प्रतिभा नलोडे, सौ विमल चौधरी, सौ कल्पना शारवाले, सौ आरती अरगडे, सौ आशा वानखेडे, सौ नीता पवार यांनी यात उत्साहाने सहभाग घेतला.




