80 व्या भारतीय स्वातंत्र्यदिना निमित्त व शिवभक्त-अजित शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त श्री.संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय दिवड येथील विद्यार्थ्यांना श्री.म्हसोबा मित्र मंडळ व पै.अक्षय भाऊ भालेराव यांच्या वतीने शालेय ओळखपत्रांचे वाटप

मावळ मराठा न्युज -ओवळे – मावळ तालुक्यातील दिवड येथील श्री.संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना आपल्या भारत देशाच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त तसेच ओवळे गावचे सामाजिक कार्यकर्ते-शिवभक्त अजित शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.ह्यावेळी सामाजिक कार्यकर्ते-शिवभक्त अजित शिंदे यांनी विद्यार्थ्यांना खुप शिका,मोठे व्हा.आणि स्वतःचे आणि गावाचे, शाळेचे नाव मोठे करा.असे मार्गदर्शन केले.तसेच शाळेचे मुख्याध्यापक-श्री.शशिकांत जाधव सर यांनी ह्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.तसेच विद्यालयाच्या वतीने श्री.गुलाब शिंदे सर व सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी आभार मानले.यावेळी ओवळे गावचे सामाजिक कार्यकर्ते-शिवभक्त अजित शिंदे ,युवा नेते-पै.अक्षयभाऊ भालेराव तसेच शाळेचे मुख्याध्यापक-श्री.जाधव सर,शिंदे सर,जाधव मॅडम,भांड मॅडम,गायकवाड मॅडम तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page