सोमटणे अनाधिकृत टोल नाक्या संदर्भात आंदोलन कर्त्यांना यश,मावळवासियांना वरसोली,सोमाटणे या दोन्ही टोलनाक्यावर मिळणार टोलमाफी

मावळ मराठा न्युज-तळेगाव,सचिन भांडवलकर राज्य उपाध्यक्ष मनसे रस्ते साधन सुविधा व आस्थापना सोमटणे अनाधिकृत टोल नाक्या संदर्भात भांडवलकर आणि सहकारी गेली १४ वर्षे लढा दिला आहे. अखेर त्या लढ्याला ५० % यश संपादित केले आहे. दिनांक २२ जुलै रोजी आमचे बेमुदत उपोषण चालू होणार होते पण काल दिनांक २१ रोजी तळेगाव पोलीस स्टेशन एम एस आर डि सी, आय आर बी तसेच जेष्ठ नागरिक बाळासाहेब जांभुळकर माजी नगरसेवक अरुण माने तसेच शाहू फुले प्रतिष्ठान पुणे जिल्हा सचिव जयंत कदम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष प्रसन्न आंधळे व उपस्थित पदाधिकारी यांच्याबरोबर काल मीटिंग करण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही १० मागण्या एम एस आर डी सी व आय आर बी यांच्यासमोर ठेवल्या होत्या त्या मधील त्यांनी नऊ अटी मान्य केल्या व एक अट हाय कोर्टामध्ये केस दाखल असल्यामुळे प्रलंबित ठेवण्यात आली एम एस आर डी सी यांनी पुढील अटी मान्य करून तसे लेटर आम्हाला लेखी स्वरूपात दिले आहे (१) सोमाटणे आणि वर्सोली हा टोलनाका मावळ वासियांसाठी मोफत करण्यात आला आहे (२) फास्ट टॅग मधून कट झालेले पैसे हे टोलनाक्यावरील व्यक्तीच्या निदर्शनास आणून दिल्यास ते पैसे रिटर्न भेटतील (३) टोल नाक्याच्या माध्यमातून टॉयलेट व्यवस्था मेडिकल व्यवस्था गाडी टो व्यवस्था या मोफत दिल्या जातील (४) सोमाटणे टोल नाका कामशेत व वर्सोली टोल नाका येथे नवीन टॉयलेटची उभारणी केली जाईल (५) पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी दहा वॉर्डन सोमाटणे टोल नाका लिंब फाटा व वडगाव फाटा या ठिकाणी देण्यात येतील (६) वाढत्या ट्राफिकचा विचार करून सोमाटणे लिंब फाटा वडगाव फाटा या ठिकाणी सिग्नल व्यवस्था करण्यात येईल ट्रायल बेसिस वरती लिंब फाटा येथे पहिले एक सिग्नल व्यवस्था चालू करण्यात येईल (७)मेन हायवे वरती अनेक ठिकाणी डिव्हायडर व्यावसायिकांनी आपल्या स्वतःचे फायद्यासाठी तोडलेले आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येईल (८) स्वातंत्र्य सैनिक यांना आपले ओळखपत्र दाखवून टोलनाक्या मधून मोफत जाता येईल (९) सर्विस रस्त्याला जिथे गरज आहे तिथे गतिरोधकची व्यवस्था करून देण्यात येईल अशा प्रकारच्या सर्व अटी एमएसआरडीसी व आय आर बी यांनी मान्य करून आम्हाला लेखी स्वरूपात दिलेली आहे त्यामुळे आज करण्यात येणारे बेमुदत उपोषण हे आम्ही स्थगित करून पुढील टोल नाक्या संदर्भात तील कारवाई ही कागदोपत्री चालू राहील या सर्व गोष्टीसाठी ९० दिवसाचा टाईम आम्ही त्यांना दिलेला आहे ९० दिवसात या गोष्टी पूर्ण न झाल्यास हे आंदोलन पुन्हा करण्यात येईल असे त्यांना ठणकावून सांगण्यात आले आहे हा विजय हा मावळ तालुक्यातील सर्व जनतेचा तसेच मला सहकार्य करणारे स्वातंत्र्यसैनिक माननीय श्री बाळासाहेब जांभुळकर माननीय श्री अरुण माने माजी नगरसेवक शाहू फुले आंबेडकर प्रतिष्ठान चे पुणे जिल्हा सचिव माननीय श्री जयंत कदम तसेच माझे सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते या सर्वांचे अभिनंदन.आनंद उत्सव सोमाटणे टोल नाका येथे साजरा करणार आहोत याची वेळ आपल्याला कळवण्यात येईल त्यावेळेस सर्व मावळातील जनतेने व महाराष्ट्र सैनिकांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती सचिन भांडवलकर राज्य उपाध्यक्ष मनसे रस्ते साधन सुविधा व आस्थापना यांनी मावळ मराठा न्युज ला दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page