वडगांव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने मराठी राजभाषा दिन साजरा,प्राचार्य अशोक गायकवाड यांचे व्याख्यान

मावळ मराठा न्यूज – वडगांव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त प्राचार्य अशोक गायकवाड यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी त्यांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांचे अभंगातून मराठी भाषेचे महत्व पूर्वापार अधोरेखित केले. तसेच त्यांनी विविध कवितांमधून मराठीचे महत्व सांगितले.कवी कुसुमाग्रज, कवी बहिणाबाई यांचेही कवितेमधून मराठी भाषेचे महत्व सांगितले.मराठी भाषा जपून संवर्धन करणे आपणा सर्वांची गरज आहे असेही सांगितले.मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यामुळे भविष्यात सर्व विभागामध्ये मराठी विषय बंधनकारक केला जाईल असेही सांगितले. यावेळी मोठया संख्येने वकील पक्षकार उपस्थित होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष ॲड सोमनाथ पवळे, प्रा विक्रांत शेळके, सचिव ॲड अक्षय रौंधल,ॲड धनंजय कोद्रे, ॲड मुनाफ शेख, ॲड सारिका पिंजन, ॲड अभिजित लोखंडे, ॲड किरण बिनगुडे आदी वकीलवर्ग उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page